Friday, February 11, 2011

कोकनातलो जोक .....

कोकणात पावसाळा सुरु झाला की शौचास जाण्याचा खुप
प्रोब्लेम होतो (खाली चिखल वरुण पाउस ) म्हणून कोकनाताले लोक नारळाच्या झापा पासून एक तात्पुरते शौचालय बनवितात त्यास कुढ्ल म्हणतात.
तात्या : मला सांगा बालानु आपला कुढ्ल नदित कुणी ढकलला ?
मुले : शपथ तात्या माहित न्हाई हो कुणी ढकलला ?
तात्या :- अस्सा ,खरेच बोलता काय ?
मुले : खरेच बोल्ताव आम्ही.......... बरे बरे.......
एक गोष्ट सांगतो लेकानो ,निट एका बरे!,
जॉर्ज वाशिंगटन ला दोन भाऊ होते ते तिघे लहान हुते तेव्हा त्यांच्या बा ने एक नारऴाचे झाड़ लाविल होत.,त्याच् नारऴ खाण्यासाठी तिघांची बी रोज भांडन व्हायची म्हणून एक दिवस त्येंचा बा बाहेर गेल्यावर
जॉर्ज वाशिंगटन ने झाड़ च तोडून टाकले .
त्येंचा बा घरी आल्यावर त्याने सर्वाना लाइन मध्ये उभे करून विचारले नारऴाचे झाड़ कुणी तोडले ?,
पण कुणीच कबूल होइना ......
मग त्यांचा बा म्हणला जे कुणी खर
सांगन त्याला मोट्ट चोकलेट देतो मी खरच!
ज्वार्ज वाशिंगटन लगेच म्हणाला "पप्पा मी तोडले झाड़ "त्येच्या पप्पानी त्याला एक खुप मोठ चोकलेट दिल,
म्हणजे खर बोलल्याबद्दल त्याला बक्शीश मिलाल!.........समजले.......!
आता तुम्ही सांगा ,"आपला कुढ्ल नदित कुणी ढकलला ? "
जे कुणी खर सांगन त्याला मी पण मोट्ट चोकलेट देतो ,
धाकटा मुलगा चोकलेट च्या नादान
हुरळून म्हणाला , त्तात्याव मीच ढकलला की कुढ्ल नदित हो खरच शपथ !
तात्याने त्याच्या खनकन कानाखाली वाजवली आणि म्हणाला ....
"भाडया......ज्वार्ज वाशिंगटन ने जेव्हा झाड़ तोडले तेव्हा त्यांचा बाप
नव्हता बसला झाडावर !"

दोन पेग मारून................

मानुस च बनला माणसाचा वैरी ..
तोंडावर हसू अन पाठीला सूरी ................
अशा नत द्रष्टाना
आपण कसे हेरायचे
आम्हीच पोखार्ल्यात भिंती घराच्या
हे किती दिवस लपवायचे ?
खाल्ल्या आयुष्यभर खस्ता
सावलीसारखे जपले
तुम्हाला हवी "स्पेस"
त्यांना वृध्दश्रमि नेऊन सोडले
शहाण्याचा आव आणून तोंडावर खोटा
भाव आणून किती जणांना फसवायच
अस कुठवर चालायचं ......................
एकलव्यान मानल द्रोणास गुरु ...
दिला अंगठा म्हणुनी "गुरुदक्षिणा"
आजचेच काही "गुरु"
प्रायव्हेट ट्युशन घेऊन किती उकळतात "दक्षिणा"
भूछत्र उगवतात तसे उगवले
शाळा ,कॉलेज ,आणि नरसऱ्या ..........
डोनेशन ,अडमिशन ,फी ,आणि फंड
पार करत सामान्यांना येतात घेरया............
अशा "ज्ञान" विकणाऱ्या गुरूना..
आपणच किती सोकावतो आहे
कॉम्पिटीशन चा जमाना आहे म्हणून आपनच
त्यांच्यामागे धावतो आहे
दुष्काळी बळीराजा ,वैतागला हळहळला ...
कर्जाला टाटा बाय - बाय करून
देवाघरी विसावला
सरकारी प्यकेज चा फायदा
मधल्या च बोक्यानी उचलला
अशा बोक्याचं कंबरड
देवबाप्पा तू का मोडत नाहीस ..........
गरिबाला दिलीस अर्धी भाकरी
ती हि तू सोडत नाहीस ...........
ऐश्वर्य ,बंगला अन गाड्यांच्चा त्यांच्याकडे चमचमाट...................
गरीबाकड १-२ मडकी गाडगी
फाटलेली गोधडी अन मोडलेली खाट..............
जो पाप करतो
म्हणतात त्याचा घडा इथेच भरतो
मरण तर सर्व जीवांना अटळ
गरीब हि मरतो अन पापीही मरतो .............
पण (भ्रष्ट बोका )पुरेपूर जगतो
अन पुरपूर उप भोगतो
बिचारा गरीब चार घासासाठी
डोक्यावरच्या छतासाठी
रोज मरून जगतो
लढत पडत शेवटी
कुठतरी जाऊन खपतो
कोण गेलेय स्वर्गात अन कोण गेलेय नरकात
कोण पाहायला जातो ?
ज्याला हि अंदाधुंदी नाही बघवत
तो काय करतो ...........
एकट्याने काय लढणार ह्या .....
माजलेल्या बोक्यांशी ..
म्हणून दोन पेग मारून
निवांत झोपतो ..................

Sunday, February 6, 2011

आई मी पतंग उडवीत होतो..................

आई मी पतंग उडवीत होतो..................
काल परवा दोन तीन छोटे शुर शिपाई हातात काठी आणि त्याला पुढे आकडी असा लवाजमा घेऊन काटलेल्या पतंगाच्या मागे पळत होती त्याला पाहून मला पण आमचे लहानपण आठवले "अरे यार आपण पण असेच होतो कि , पतंग पकडायला आकडे घेऊन पळणारे ,कुणाच्या गच्चीत ,कुणाच्या कम्पौंड मध्ये घुसणारे !
पतंग हा शब्द ,लहानपणी ऐकला तरी हवेत तरंगायला व्हायचं आम्हाला....
तुम्ही म्हणाल हे मुलाचं खूळ तुला कस ग ?(लहानपणापासून आम्ही मुलांचेच खेळ जास्ती खेळलो, कॉलनीत १०-१२ मुल आणि दोन चार मुली मग जास्तीची म्याजोरटी कळल !) क्रिकेट पासून विट्टी दांडू , ते फुटबाल पासून लीन्गोर्चा.........सगळ सगळ अगदी मनसोक्त भरभरून ..........
हो तर काय सांगत होते , ह संक्रांत म्हणजे आमच्या सर्व ग्रुपचा आवडता सन ,एक तर मनसोक्त पतंग उडविणे ,दुसर पतंग पकडणे ,आणि तिसरे संध्याकाळी किती भांडण झाली तरी तिळगुळ देऊन मिटवणे
संक्रातीच्य आधी नाताळच्या सुट्ट्या असायच्या सर्वाना मग काय ,सर्वे धंदे त्या सुट्टीत च उरकून घ्यायचे
पहिला म्हणजे मांजा सुतावण्याचा सार्वजनिक कार्यक्रम !
एक दिवस ठरवायचं ,चक्री,शिरस ,आणि दोरा विकत आणायचा
मग छोटीशी चूल करून त्यावर एक जळक मळक पातेलं ठेऊन त्यात
शिरस उकळायच कलर टाकायचं मिश्रण तय्यार !
मग त्यात दाभन किंवा गोधडी शिवायची सुई घेऊन त्यातन दोरा आरपार ,
काच (भुकटी ) कागदाच्या पुडीत घेऊन बोर होत बसायचं काम जास्ती करून मुलींकडच असायचं ,
मग एक मुलगा चकरीला दोरा गुंडाळत दूरवर नेणार आणि मग लपेटत लपेटत येणार चक्री भरेपर्यंत तहान भूक विसरून आमचा हा उद्योग चालायचा , असे सर्वांचे मांजे सुतावाण्यात आमच्या सुट्ट्या संपायच्या , आणि मग आम्ही पतंग बनवायच्या तयारीला लागायचो
पतंग विकत घेण्यापेक्षा घरीच बनवायचो आम्ही ,एक ताव आण्यायचा मग ज्याला जसा आवड्त्तो तसा पतंग बनवायचं ,
छोटुला पतंगाचे भारी वेड !
कुणी टूक्कल ,कुणी झोपडा, कुणाचा bombe top ,तर कुणाचा तिरंगा
कुणाला १ शेपूट ,कुणाला २ आणि कुणी ३ लावायचो ,सुत्तर पाडायचे काम बहुतेक अन्नांकडेच असायचे
शाळा दुपारीच सुटायची त्यामुळ आमचा पतंग महोत्सव ३-४ दिवस आधीपासूनच सुरु !
घर दुमजली होते ,गच्ची हि बर्यापैकी होती ,दुसर्या मजल्यासाठी भक्कम जिना होता ,पण तिसर्या मजल्यावर चढायला जिना नव्हता ,लाकडी शिडी होती ,त्यामुळे आई अन्ना नेहमी रागवायचे ,खाली उभ राहून पतंग उडवा ,वरती नाही चढायच आजीबात ,तसा एक दोनदा प्रयत्न हि केला पण पतंग कधी गुलमोहरात ,नाही तर लाईटच्या वायरीत,नाहीतर कुणाच्या गाडीला अडकायचं
त्यामुळे नाईलाजाने आम्ही तिसरा मजला सर करत असू ,
(अण्णांना घेतल्याशिवाय वरती चढायच नाही अशी सक्त ताकीदच होती )
अन्ना शिडी धरायचे एक एक करून आम्ही गच्चीत , सर्वात शेवटी छोट्या ,त्याला नाही घेतलं तर त्याच तांडव (अ ग ग ग ग ) विचारूच नका ..........
अशा आमच्या करामती मुळे एक संक्रांत अजूनही लख्ख आठवते
आम्ही ६-७ जन तिसर्या मजल्य्वर चढलो होतो ,पप्पूने आधी ट्रायल म्हणून एक टूक्कल घेतली ,चक्री धरायला मीच होते ,आम्ही आता पारंगत झालो होतो शिडीवरून खालि वर करायला त्यामुळ आईची भीती बरीच कमी झाली होती ,नेमके अण्णा त्या दिवशी बाहेरगावी गेले होते ,त्यामुळ टेन्शनच नव्हते ,फक्त मनसोक्त पतंग उडवायचं ,काटाकाटी करायची ,असे ठरवूनच मैदानात उतरलो होतो आम्ही !
मस्त छान रंग बिरंगी पतंग ऐटीत उडत होते ,
पप्पुने आधि टूक्कल घेतलि उडवायला
टूक्कल जरा डूगायला लागली कि आमचा छोटा मध्येच," ए मला पण दे णा दे ना दे दे ,दे कि "दे कि नाहितर .........
पप्पू : - कुणी घेतला रे ह्याला ?,च्यायला नसती कटकट
छोट्या :- तुं नै दिली तर ,मम्मीलाच बोलावून आणतो थांब !
पप्पू ; ए ,घे भो धर धर ,
छोतुने टूक्कल घेतली , १ -२ मिनटात झोकांड्या खात कन्नी करून झाडात अडकवून टाकली
पप्पू:- झाल समाधान ! बसा आता
पप्पूने यावेळी मोठा झोपडा लावला गोत घ्यायची म्हणून
झोपडा मस्त ऐटीत डुगत होता
तेवढ्यात पलीकडच्या गल्लीतल्या एका गच्चीवरून आरोळी आली "एय घ्यायची का गोत ?"
पप्पू म्हणाला घेऊ का रे ?
मी म्हटलं नको एवढी ढील दिली कटून गेला तर अर्धी चक्री रिकामी होईल
हो नाही करत गोत बसली
पण त्या कार्ट्याने आखाड्पेच करून आमचा झोपडा खेचून तोडून घेतला ,(गोतीचा नियम भंग )
पप्पू:- "ए भडव्या झोपडा दे चुपचाप ,तिकडे आलो तर मार खाशील बर..
पलीकडचा :-" देत नाई जा ,तुला काय तुझ्या बापाला पण नई घाबरत फुट !
पप्पू ने शिव्यांचा मारा सुरु केला हिकडून, तसा तिकडून पण डबल सुरु झाला
कधी नवात आमच्या सर्व शिव्या कामी आल्या , तो मुलगा काही ऐकत नव्हता डांबिस कुठला !त्याच्या मुरलेल्या खानदानी शिव्या आणि आम्हाला घाबरवण्यासाठी त्याने एक दगड भिरकावला पण त्याचा नेम चुकला
पप्पूचा राग एकदम अनावर झाला
आणि त्याने गच्चीत पडलेला
एक छोटा दगड त्याच्याकडे भिरकावला
गोटयात नेम नाही म्हणू हरणाऱ्या पप्पूचा नेम यावेळी एकदम अचूक लागला होतादगड त्या मुलाच्या काखेत लागला,
लागल पण ,इतक नाही याची खात्री होती पण झाल उलटच !
तो जोरजोरात बोंबलायला लागला
हिकड भीतीमुळ सर्व
मन्या, पंक्या,राणी, अभ्या सगळे
टाबर(मुल) पटापट आम्हाला सोडू न पळून गेले
उरलो आम्ही तिघे पप्पू मी अन छोटू
त्याला कसे बसे खाली घेतले ,गुपचूप घरात आलो
आई म्हणाली "काय रे काय धाड धड चाललीये पळापळी नुसती ,पतंग चावून खायचे का ?"
तीच वाक्य पूर्ण होतय नाही तोच दाराची बेल वाजली नव्हे वाजतच राहिली पप्पूला आणि मला कल्पना होती (कि त्या मुलाची आई नक्की भांडायला आलेली आहे) आता आमच्या दोघांच काही खर नाही झाडूचा मार एकदम पक्का !
आई:- कुणाचा जीव चालालय एवढी दाणादाण बेल वाजवतोय
तेवढ्यात आमच्या छोट्याने :"मम्मी आपल्या पप्पूने दगड मारलाय एका मुलाला " सांगून मोकळा
आईने दर उघडले तसे दोन चार शेंबडी पोर,(घर दाखवायला )
७-८ बाया माणसाचं लवाजमा घरात घुसला ....
बाहीर काढा आधी,(ज्याच्याशी पंगा घेतला तो वैदुवाडीतला मुलगा होता )
" कुठ हाये त्यो तुमचा मुलगा ,आण त्याला भाईर, मुलाला मारतो काय ? कुठ लपला (बाथ रूम मध्ये )
वैनी बोलाव त्याला बघा त्याने दगड मारलाय पोराला ,
आईला तर काय सुचेनास झाल ती थांबा थांबा एक मिनिट करत होती पण हे लोक काय ऐकतील तर, स्वताच घरात शोधमोहीम सुरु केली
आमचा छोट्या तर एव्हाना रडू लागला होता मी भीतीने थरथर कापत होते ,आईला एवढ्यानं आवरण कठीण होत ,
तेवढ्यात आमची आज्जींच आगमन झाले
नववारी साडीचा पदर खोचून आजी मैदानात उतरली ........
एय भडव्यानो ,व्हा बाहेर आधी ,तुमच्या बापच घर आहे का हे कुठ घुसताय ? घरात गडी माणूस नाही म्हणून ........
एक बाई मधेच आजीला म्हणाली "ओ तुम्ही मध्ये बोलू नका आजी ,स्वताच्या पोरांची चूक पोटात नका घालू बाहेर काढा त्याला आधि "
त्यांचा रुद्रावतार बघून आई बरीच घाबरली होती ,पण आमची आजी शूर योध्यासारखी त्यांना तोंड(शिव्या )देत होती
तिच्या त्या गावरान शिव्या अर्र्र्रर्र्र्रर्र्र्र ............
तिला बघून मला पण चेव आला मी पण म्हणाले "ओ काकू तुमच्या मुलाने का पतंग पकडला आधी आमचा ? त्याची चूक आहे "आजी हे खोट बोलतायेत ,एवढासा दगड मारला होता पप्पूने ,
बाई (रागाने ) : -ए मैना ,गप राहा जास्त चिव चिव नको करूस (राहील)
आजी ;-काय म्हणन तरी काय ,एवढा कालवा कशाला ?
बाई : ५०० रु दे आत्ताचं आता दवापाणी करायला पैसे नाहीत हॉस्पिटलात घेऊन जायचं
आज्जी :- तुझ्या बापाने तरी नेल होत का हॉस्पिटल मधी दगड लागल्यावर ?
बघू कुठय तो ?किती लागलाय? चल मी पण येते दवाखान्यात तुझ्याबरोबर ,
बाबा : -मग लागलाय त्याला का खोट बोलतो आम्ही ?
आजी :- कुठाय त्यो मुलगा ?कुणाला लागल बघू ?
" चाल ना ,मग दाखव न ,देते न ५०० काय १००० देते दाखव तरी आधी ..
तो पर्यंत हा सावळा गोंधळ ऐकून शेजारचे चौधरी सहकुटुंब धावून आले मदतीला
(चौधरी काका ६ फुट, उंची डोक्यावरचा मंडप पडून झालर राहिलेल ,आवाज एकदम कडक कुणालाही दरारा वाटेल असा )
काका:आधी बाहेर व्हा घरात बाईमाणस पाहून गोंधळ करता का?पोलीस केस करू का?फुकटच पिठल भाकरी खायची हौस आहे का ?
चला व्हा बाहेर अस म्हणत त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी त्यांना अक्षरश बाहेर काढले
शिव्याची देवान घेवाण आता कॉलनीत चालू झाली ,गेटच्या बाहेर त्ये आणि आतमध्ये आम्ही
येणारे जाणारे थांबून आस्वाद घेऊ लागले ,
(काहीजणांना फार बरे वाटल असेल)
त्यांच्या त्या खानदानी शिव्या आमच्या आजीच्या गावरान शिव्यान पुढ मिळमिळीत वाटत होत्या शेवटी एवढ करून हि ऐकत नाही म्हणल्यावर त्यांनी नाईलाजाने माघार घेतली आणि हिरमुसले होऊन परतले
आता आमच्या दोघांचा समाचार !
आजी : -कुठाय पप्पू ,कारटा, मेला नुसता ताप आहे डोक्याला !
येऊ दे तुझ्या बापाला फोकानीच बडवायला सांगते ....
आणि तू ग (मी)काय लाज वाटते का तुला ,गच्चीत जाता? धडपडलीस हात - बित मोडला म्हणजे कोण पत्करेन !
सगळी ग्यांग गेल्याची खात्री करूनच पप्पू बाथरूम मधून बाहेर आला
आजीचे ,आईचे ,काकांचे ,उरलेसुरले शेजार्यांचे मोलाचे सल्ले निमूट पने एकूण घेणे भाग होते
जशी जशी संध्याकाळ झाली तशी तशी हुडहुडी भरायला लागली थंडीने नव्हे आण्णा घरी आल्यावर किती मारतील त्याच्या विचाराने !
एवढा गोंधळ , पतंग पण नाही उडवायला मिळाला ,वरतून आईचा दोन चार धपट्यान्चा मार आधीच बसलेला .........
आता आन्नाच्या ढाई किलोचा हाताचा प्रसाद आज तरी नको होता
आई शेवटी आजीला म्हणाली "जाऊ दे ,चूक झालीये पण ह्यांना नको सांगायला सणासुदीचा मार बसेल ",नंतर सांगूया निवांत !
एकमत झाले, पण आमचा छोट्या, तो अशी imotinal ब्ल्याक मेल ची सुवर्णसंधी एवढी सहजासहजी सोडणार होता का ?
एक drawing बुक , कलर पेन्सिल , २ चीक्क्या , आणि खूप सारी आवडत्या चोकलेट ची रिश्वत घेऊन छोट्या गप्प बसला ........
संध्याकाळी अन्ना घरी आले सर्व एकदम चिडीचूप ,छोट्या दिवाणवर पालथा पडून चित्र काढण्यात बीजी होता.
अण्णा :- " हे काय पप्प्या,पियू आवरलं नाही अजून? तिळगुळ घ्यायला जाणार नाही का ?तुमची ग्यांग नाही आली अजून?
(आमची १०- १२ जनाची ग्यांग ,प्लास्टिकचे छोटे डबे ,रुमाल नाहीतर ,छोटी क्यरीब्याग घेऊन तिळगुळ घ्यायला (लुटायला) निघणार ,खाणार नाही,साचवाणार, कुणाचे किती झाले ते ,दरवर्षीचा नियम ह्या वर्षी चुकला )
मी :- नाही, नको अन्ना तब्येत ठीक नाही आज दोघांची पण !
अन्नाच्या कपाळावर आठ्या (ह्यांच्या कडे बघून कोण म्हणेन आजारी ?असो)
चला आजच दिवस तर टळला ह्या भ्रमात आम्ही टी व्ही पाहत बसलो
तेवढ्यात शेजारच्या बडबड्या आजी तिळगुळ घ्यायला आल्या आमच्या आजीकडून ,दरवर्षी यायच्या ........
कुठाय पप्पू , ये बाला ये तीळ गूळ घे ये, ये ग तू पण , "कारे मारलं बिरल का तुला त्या लोकांनी ?">"कारे मारलं बिरल का तुला त्या लोकांनी ?" हे वाक्य ऐकून अण्णा बाहेर आले काय झाल ? ,कोणते लोक ? कुणाला मारलं ?
मला काही कळेल का? (आईकडे रागाने )
आई :- अहो काही नाही , काही विशेष नाही ,मुला मुलांची भांडण बाकी काय ?
अण्णा : हम्म्म ,कुणाशी आज ?
आई : जाऊ द्या न ,लोक येतील तिळगुळ घ्यायला तुम्ही आवरा लवकर
पण ती आजी गप्प बसेल तर ,"आमची सुपारी घेऊन आली होती कि काय"
सर्व पतंग पुराण एका दमात सांगून टाकल म्हातारीने (अस वाटल म्हातारीला ................कायमच गप्प .............) वाईट विचार ...........
आपल्या रतणांचा दिव्य पराक्रम ऐकून अन्ना चांगलेच तापले ,पप्पू बाहेर ये लवकर कार्ट्या २-३ रु च्या पतंगी साठी एवढे तमाशे करता नालायाकानो ,एवढी मुल आहे कॉलनीत कुणाच आवाज नाही ,तुम्हालाच माज चढला ?उतरवतो चांगला ,तेवढ्यात शेजारचे काका काकू तिळगुळ घ्यायला आले आणि आम्ही वाचलो ,
(अण्णांची अवस्था "एकीकडे खोट खोट हसतायेत , एकीकडे आमच्याकडे नि आईकडे रागाने पाहतायेत )
असे लोक १२ वाजेपर्यंत येऊ दे रे देवा ,म्हणजे आम्ही वाचलो अशी प्रार्थना करून आम्ही आजीच्या कुशीत निवांत झोपी गेलो .......................
त्या नंतर २-३ वर्ष अण्णा बरोबरच पतंग उडवला आम्ही
नन्तर ग्यापच पडत गेला .............
आता बर्याच वर्षांनी पुन्हा पतंग उडवणार आहे ह्या संक्रांतीला
"देखेंगे क्या होता हे "......................

मी, पिलू आणि जॉगिंग ....................

मी, पिलू आणि जॉगिंग ..........................
पिलू चा परिचय ( पिलू हा आमचा लाडका १ वर्षाचा भू भू आहे ,१ महिन्याचा होता तेव्हा भावाने आणले होते पाळायला ,त्याला पिलू म्हणायचो आणि तेच नाव पडल )
हिवाळ्यात जठराग्नी फारच क्रियाशील असतो (असे म्हणतात ),त्यामुळ जास्ती भूक लागते ,पण ह्या जास्तीच्या खावडी मूळ माझ वजन ३-४ किलो वाढल चांगलच ! आता काय करायचं ? जिमला जायचं ? नको ते फार दूर आहे ,आणि मुलींची ब्याच दुपारी असते
मग घरीच दोरीवर उड्या मारून पहिल्या ८ दिवस ,भाऊ ओरडायचे ए.sssss काय सकाळी सकाळी भूकंप झाल्यासारखं वाटतय
गपे ...................................................
८ दिवसात ३०० ग्र्याम कमी फक्त ,याचा काही उपयोग नाही व्हायचा ,......मैदानात badminton खेळावं तर तिथे कॉलनीतल्या मुलांचा कट्टा ,दुसर काय कराव बर ?
शेवटी अकलेचे दिवे पाजळून जॉगिंगचा पर्याय शोधला सकाळी उठून जॉगिंग करायचे किमान अर्धा तास ,आई तयार झाली माझ्या बरोबर यायला
झाल रोज सकाळी साडे पाचला आई म्हणायची चला ,उठा जॉगिंग ला नाही जायचं ?अस म्हणत बिछाना खसकन ओढायची ,(असा राग यायचा )मी परत पाच मिनिट करत तोंडावर घायची अशा ओढ -ओढीत अर्धा तास तरी निघून जायचा कस बस उठून आवरून साडे सहाला बाहेर पडायचो ,
मग फिरून आल्यवर परत झोपायची सोय नाही
झाले ,रुटीन सुरु ..........सकाळी उठायचं अगदी जीवावर यायचं पण फिरून आल कि मस्त फ्रेश वाटायचं
७-८ दिवस झाले नाही तोच आमच्या जॉगिंगचे तीन तेरा वाजले आणि आम्हाला बंदी घालण्यात आली सांगते किस्सा ...........
चार पाच दिवसापूर्वी आईचा गुडघा दुखतो म्हणून आई सकाळी मला म्हणाली आज मी नाही येत तू पप्पूला नाहीतर प्रशुला (बंधू आमचे)घेऊन जा
(पप्पूला नाहीतर प्रशुला ते दोघेही जाम आळशी त्यांची सक्काळ ९ ला सुरु होते )
दोघानाही उठवण्याचा प्रयत्न केला ,पळए .......................जा ना तू सकाळी सकाळी बोर नको करू जायचं तर जा ,परत उठवशील तर बघ ...?
असा सज्जड दम दिला मला..............
आजीला म्हणाल तू येते का ?( तिने रागाने पाहिलं कारण तिला केरकचरा ,अंगणात सडा मारायचा होता ,रोजचा
नित्यक्रम .........)
काय करावे कुणाला जॉगिंगसाठी तयार करावे हा मोठा प्रश्न होता ,तसे
कॉलानितल्या ४-५ टाळकी (मावश्या) जायची फिरायला पण त्यांच्या बरोबर न गेलेलच बर कधी हि भेटल्या तरी एकच प्रश्न "काय पियू आता लाडू कधी ?शिक्षण झाल,जोब पण करतेय छान,
(जस लाडू हे फार दुर्मिळ खाद्य आहे आणि माझ्या लग्नातच याना लाडवाच दर्शन होणारेय )
असो............
विचार करता करता १५-२० मिनिट गेली
तस डोक्यात क्लिक झाल.......
अरे आपला पिलू आहे कि आपल्याबरोबर !तशी हि तो कधीपण वाटच बघत असतो कधी गेटच्या बाहेर हुंदडायला मिळेल याची !
चला आज त्यालाच सैर करून आणू हा विचार पक्का झाला
घरी सांगितले मी पिलूला घेऊन चाललेय बरोबर
आई ; सांभाळून ,तुला जमेल का ?फार ओढतो तो बघ बाई ,नाहीतर व्हायची पंचाईत
मी ;- टेन्शन नको ,मी आहे वोक्के !
मी त्याची साखळी सोडत होते तेव्हा तो आनंदाने इतक्या उड्या मारत होता ,शेपटी हलवत होता ,दोन पायावर उभ राहून माझी गळा भेट घेत होता
आता आम्ही दोघही कॉलनीच्या बाहेर पडलो १० मिनिटावर एक जॉगिंग पार्क आहे तिथ जाऊन पिलुला बांधून थोड मस्त जॉगिंग करूया असा आमचा एकतर्फी प्लान होता
थोड चौकात गेलो तर एका आलिशान गाडीच टायर बघून पिलुने ते ओले करून टाकले ,जाऊ दे ..............
आता पिलू इकडे तिकडे बघत मस्त ऐटीत चालला .जणू तोच फिरायला आलेला............(आणि मी त्याची सेवक )
फिरायला जाणार्या लोकांची ये जा चालूच होती
ओळखीचे चेहरेहि दिसत होते,
मी आणि पिलू मस्त रमतगमत निघालो ......
दिवसा खचाखच भरलेले चौक शांत शांत होते ,
बायाबापड्यांची केरवारा ,सडा रांगोळी चालली होती
बालाजीच्या मंदिरात आरती चालू होती .........एकदम प्रसन्न वाटत होते
असेच आम्ही दोघे चालत असताना
समोरच्या चौकात ते दोघे बसले होते
आम्हला पाहताच ते दोघे (कुत्रे)उठून उभे राहिले आणि त्यांनी पीलुकडे बघून गुर्र्कायला सुरुवात केली .
( बहुतेक त्यांच्या भाषेत म्हणत असतील "ए हिरो,
मुह उठाके किधर चला रे sssssssssचल ,अभी इधर से कल्टी मार ये इलाका अपुन का हे ,क्या समझे ")
ते गुरकाताय पाहून पिलूही चालू झाला .भोव भोव भोव भोव ....................(पिलूचा आवाज एकदम खणखणीत )

(चल, चल, रस्ता क्या तेरे बाप का हे क्या ? चलबे शाना बन )
ते दोघे तिकडून आणि हा इकडून
त्यांना हाकलण्यासाठी मी दोन तीन छोटे दगड मारून पहिले .......हाड हाड हाड ...............
पण ते वस्ताद त्यांचा एरिया होता म्हणून जास्ती शायनिंग मारत होते .जागचे हलायला तयार नाही
इकडे पिलूला पण चेव चढला मी त्याला पिलू गप्प गप्प म्हणायचे तसा तो जास्तीच भून्कायाचा
जणू सर्व आसमंत त्यांच्या भुंकण्याने दमदमून गेले
त्यांना पाहून काही लोकांच जॉगिंगच रुपांतर रनिंग मध्ये झाले
काहींनी तर तिथून मागे कल्टी मारून टाकली
( कुतार्यांच्या भांडणात मध्ये पडायला
कुणी डेरिंग करत नाही,ज्याच्या त्याच्या मर्जीचा (बेंबीचा) प्रश्न !)
सगळे दुरूनच हयाड हायड हयाड..................................
आता गुरगुरणे थांबून जोरजोरात भुंकण चालू झाल पिलू आमचा त्यांच्या दिशेन झडप मारायला बघत होता आणि ते दोघे पण पिलुला घेराव घालत आमच्या एकदम जवळ आले त्यांचा जोडीला अजून १-२ सामील झाले आता माझे काही खर नाही कुत्रा चावल्यावर नक्की किती injection घ्यायची हा विचार चालू झाला मी सर्व शक्तीनिशी पिलूची साखळी धरून त्याला जितकी मागे ओढत होते तितक्या दुप्पट वेगात तो मला खेचत पुढे घेऊन जात होता
दोन चार मिनिटांच्या गोंगाटात मला सकाळी सकाळी घाम फुटला होता ,
पिलुला दुसर कुत्रा चावू नये ह्या भीतीपायी मी साखळी घट्ट धरली होती कारण त्याच्या व्यक्सीनेशनला त्याने डॉक्टरांची
आणि आमची कशी पंचाईत केली होती हे आम्हला चांगलेच माहित होते
आणि त्यांच्या एकमेकावर झडपा - झडपी चालू झाली पिलुला आवर्रायाच सोडा, तोच मला चांगला फरफटत होता साखळीने हात पार कचून कचून गेले..
मी हि ठरवले होते काही झाल तरी साखळी सोडायची नाही माझ सर्व शक्ती एकवटून पिलुला खेचण चालंलेल आणि पिलूच मला "कीस झाड कि पत्ती समजून फरफटवन ! पिलू चांगलेच हिसके मारत होता
या आमच्या खेचाखेचीत जोर लावल्यामुळ साखळीच हुक तटकन तुटून पट्ट्यात राहील आणि साखळी माझ्या हातात !
माझे दोन दात खांबावर आदळून पडण्याचा योग होता पण तो थोडक्यात हुकला
दोन सेकंद काही सुचलच नाही कुत्रांची क्याव क्याव ,भोव............ भोव होऊन पांगापांग झाली पिलू आमचा जीव खावून एका कुत्र्याच्या मागे पळत एका गल्लीत दिसेनासा झाला
मिनिटभर काही सुचलच नाही आणि
आणि मी मागून पिलू पिलू ओरडत पळायला लागले
"फार उत मला ह्याला फिरायला आणायचा मरा आता"
एक दिवस जॉगिंग नसत केल तर ...............पण नाही आम्हाला ssss फार भोगा आता
वरतून पिलू सापडला तर बर नाही तर .........काय काय ?
अरे यार एक वेळेला मी हरवले तरी चालेल पण पिलू हरवला तर .........केवढे बोलणे बसतील पप्पूचे त्याचा लाडका न तो !
अरे बाप रे गोची झाली हा विचार करत मी सकाळी सकाळी भाजीवाले, इड्लीवले ,
फेरीवाले जश्या आरोळ्या ठोकतात तसे पिलू पिलू करत करत बोंबलत सुटले ,जिथ कुत्र्यांचा भूकाण्याचा आवाज येईल त्या दिशेन धावत सुटले ,कुणाचा कारखाली बघ .कुणाच्या कम्पाउन्ड मध्ये बघ, कुठ घाबरून बसलाय का? त्याला बाकीच्या कुत्रानी चावले तर नसेल न ?असे दुष्ट विचार येऊ लागलेले बिचारा पिलू कसा असेल ?कुठे असेल ?
बर भावाला फोन करावा तर
मोबाइलच नव्हता जवळ , दुकाने उघडली नसल्यामुळ करणार तरी कुठून ?आणि समजा कुणाचा फोन उसना घेऊन केलाही असता तरी सकाळी सकाळी शिव्यांचा ( म्हणजे तश्या नाही ,गाढवे ,मूर्खे ...इति) खरपूस नाष्टा आम्हास नकोच होता म्हणून पिलुला शोधून घरी नेणे एवढाच पर्याय शिल्लक !
एका कनवाळू बाईला माझी दया आली ती म्हणाली पिलू तुमचा लहान मुलगा आहे का ?हात सोडून पळाला का कुठ ?
( डोम्बल तुमच ) पिलू कुत्रा आहे माझा ....
(कुत्र्याच नाव पिलू ठेवत का कुन्ही?) चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन तोंड वाकड करून सडा घालू लागली
जिथे जिथे कुत्री भुंकण्याचा आवाज येत होता तिथे तिथे मी पिलुला शोधत होते ,माझ्या या शोध मोहिमेत मला दोन चार लहानग्यांनी फार मदत केली ,पण ती वायाच गेली पिलू काही सापडला नाही साडेसात वाजले ,आता घरी जाऊन भावाला सांगणे आणि सर्वांची बोलणी खाणे एवढाच पर्याय शिल्लक !
हताश होऊन मागे फिरले ,डोळ्यासमोर सारखा पिलूच ,आज माझ्य शहाण पनामुळ पिलू हरवला ,काय गरज होती मला ..........इति. फारच अपराध्यासारख वाटत होत ,कारण पिलू सर्वांचा लाडका !घरी आले ,"पिलू हरवला " एका दमात सांगून टाकले ,त्या वाक्याने झोपलेले आळशी सदस्य खडबडून जागे झाले क्काय ? पिलू हरवला कुठे ? कधी ?कसा?ते सांगायला वेळ नाही आधी त्याला शोधाव लागेल !झाल सगळीकडून एकाच प्रश्न "तुला काय गरज होती पण त्याला बरोबर नेण्याची बावळट!"माझा चेहरा रडवेला झाला होता
एरवी चूक माझी नसताणा जर कुणी मला बोलल तर ,त्यांना आपण का हिच्या नादी लागलो ह्याचाच पस्तावा होतो
पण आज गप्प राहण्याशिवाय काय पर्याय ?
भावाने गाडी काढली :चल बस मागे लवकर , गाडीवर बसणार ,तोच पिलू धावत धावत (जणू एखाद महायुद्ध जिंकून) घराकडे येताना दिसला
त्याला बघून मला एवढा आनंद झाला , कि जेवढा
अमर अकबर अंथोनी मधल्या प्राण आणि निरुपमा रोय यांना त्यांची हरवलेली ३ मुल २० वर्षानि सापडल्यावर हि झाला नसेल
असो .....................
पिलू सापडला ,(नव्हे परत आला.....................)
जग जिंकल अस वाटल
आल्याबरोबर शेपूट हलवत गळा भेट घेतली त्याने माझी आणि पप्पूची .................
आनंद अवर्णनिय ........................
आता या गोष्टीला ७-८ दिवस झालेत आता मी त्याला फिरवण्याची रिस्क घेत नाही (बंदी आहे )

बिर्याणी विथ बटर चिकन ग्रेवी

बिर्याणी विथ बटर चिकन ग्रेवी
बिर्याणी साठी : - अर्धा किलो तांदूळ ,अर्धा किलो चिकन , ३ चमचे दही ,तमालपत्र ,शहाजिरे ,दालचिनी , लवंग ,काळेमिरे,मोठा वेलदोडा ,
आल लसून पेस्ट २ चमचे , २ मोठे कांदे उभे चिरलेले ,२ मोठे टोमाटो चिरलेले ,.कोथिंबीर ,हिरवी मिरची ५-६ ,हळद ,मीठ .१-२ चमचे बिर्याणी मसाला ,१ चमचा  लाल तिखट
कृती :- तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा , चिकन मध्ये थोडेस दही ,हळद,आणि आल लसून पेस्ट घालून कुकरमध्ये एक शिट्टी काढून घ्या ,पाणी थोड जास्त असू द्या , (हे पाणी आपण ग्रेवी साठी वापरणार आहोत)
आता आल लसून ,कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट मिक्सी मधून बारीक करून घ्या
पातेल गरम केल कि त्यात  आधी ३ चमचे (मोठे ) तूप /तेल घाला .नंतर खडा मसाला टाकून उभे चिरलेले कांदे घाला ,गुलाबी परतल्या नंतर ,
आल-लसून मिरची पेस्ट घाला टोमाटो घाला , छान परतून घ्या थोडी हळद ,चवीनुसार मीठ , बिर्याणी मसाला आणि लाल तिखट (जेवढ हव )
घाला फोडणीचा खमंग वास सुटला ना ,आता त्यात चिकन  पिसेस घाला मस्त मिक्स करा  आणि तांदूळ घाला आणि अंदाजे शिजेल एवढ पाणी घाला ,(तांदूळ घातल्यावर जास्त हलविले तर शीत मोडतात )
कोळशाची शेगडी असेल तर क्या बात हे ! गरम निखार्यावर बिर्याणी मस्त फुलून येते
बिर्याणी होत आली कि त्यावर तळलेले काजू , कोथिंबीर ,घालून सजवा .
 
बटर चिकन ग्रेवी
बिरयानी करताना चिकन शिजवायला जे पाणी वापरले आहे तेच पाणी ग्रेवी साठी वापरायचे आहे
ग्रेवी साठी :- पाव किलो चिकन , बटर ३ चमचे (तुम्हाला जे वापरायचे ते घ्या )  ,
अर्धी वाटी मगज पेस्ट (खरबूजा बी )  
२  कांद्याची बारीक पेस्ट  ,१ टोमाटो बारीक चीरलेल ,१ चमचा आल लसून पेस्ट , १ चमचा दही , १ चमचा लाल तिखट ,१ चमचा गरम मसाला ,१ चमच चिकन मसाला ,मीठ ,हळद  बस्स..............
फोडणी :- बटर गरम झाले कि ,त्यात १ दालचिनी आणि तेज पत्ता तुकडा घाला ,कांदा पेस्ट घाला , आल लसून पेस्ट घाला ,मस्त गुलाबी रंग येऊ द्या आता लाल तिखट घाला ,मग टोमाटो घाला ,मस्त ढवळून घ्या गरम मसाला ,चिकन मसाला .मगज पेस्ट घालून छान परतावा ,तेल सुटू लागले कि चिकन पिसेस घालून ,छान हलवून घ्या ,आणि मग चिकन शिजवलेल पाणी घाला , मीठ आणि थोडी हळद घाला ५-७ मिनिट शिजल कि घट्ट रवाळ ग्रेवी तयार होईल , हव तस सजवा .....................
 
(टीप :- ग्रेवीला  लाल भडक तरी येण्यासाठी कांदा परतला कि लाल तिखट घाला ,म्हणजे खतरनाक कलर येईल तुमच्या ग्रेविला ..)http://farm6.static.flickr.com/5246/5302989290_e1c8d7872b_m.jpg

Thursday, December 16, 2010

झटपट तर्रिवाली फिश करी .......

(बर्याच दिवसापासून विचार करत होते कोणती डिश देऊ ? आमच्या आजीला सर्दी झालिये, मग माशाचा रस्सा वरपायाचा गरम गरम  म्हणून मासे बनविन्याचा योग आला आणि  मला लिहिन्याचाही.......... )
झटपट तर्रिवाली फिश करी .......
मी चोपड़ा मासा वापरला आहे तुम्हाला जो आवडतो तो स्वच्छ धुवून काटे काढून त्याचे पिस करून घ्या.
साहित्य :- मासे पावून  किलो , ९-१० लसून पाकळ्या, १/२ -१ इंच आल , कोथिम्बिर , खोबर किसलेल ३-४ मोठे चमचे , 2 मध्यम  टमाटर , १ चमचा मीठ,
लाल तिखट (आवडीनुसार)तेल ,जीर हिंग ,कडीपत्ता, चुटकीभर हिंग आणि थोड़ी हळद...
मसाला :- खोबर ,लसून ,आल , कोथिम्बिर ,१ टमाटर , १ चमचा मीठ,    सर्वे साहित्य (न भाजता ) मिक्सी मधे थोड पानी घालून बारीक़ वाटुन घ्या .
फोडनी : तेल  आवडीनुसार घाला मी ३ मोठे चमचे घातले , त्यात जीर , कडीपत्ता , हिंग घालून तडतडवा , नंतर वाटलेला हिरवा मसाला घाला , १ चिरलेला टोमाटो घालून तेल सुटेपर्यंत खमंग परतून घ्या,  झनझनित  हव असेल तर थोड जास्ती लाल तिखट घाला ,थोड मीठ घालून पानी घाला
ग्रेवी जाशी हावी तेवढी घट्ट / पातळ करून घ्या ,थोडीशी हळद घाला ,आता फिश चे तुकडे ग्रेवित सोडा ,८-१० मिनिट झाकण ठेवा गरमागरम झनझनित तर्रिवाली फिश करी तैयार आहे ,भात , भाकरी वा चपाती कशाबरोबर ही वरपा..........
(आईची मोलाची मदत )